पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लांबविले

पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 30 हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना 5 डिसेंबरला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरात घडली. याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला 5 डिसेंबरला हडपसर गाडीतळ परिसरात पीएमपीएल बसमध्ये शिरत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. दरम्यान, काही वेळानंतर महिलेला मंगळसूत्र चोरल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस अमलदार आर. एच. सुर्यवंशी तपास करीत आहेत.