पुणे – तब्बल 52 कोटींचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी एकाला अटक

crime

बनावट कंपन्या स्थापन करुन त्यामार्फेत आर्थिक व्यवहार केल्याचे भासवून तब्बल 52 काेटी 19 लाख 15 हजार रुपयांचा जीएसटी बुडवून जीएसटी खात्याची फसवणुक केल्याप्रकरणी एका व्यावसायिकाला पुणे जीएसटीच्या गुप्तचर पथकाने अटक केली. तुषार अशाेक मुनाेत (रा.बार्शी,साेलापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी मागील काही दिवसांपासून मुनाेत धाराशिव जिल्हयातील परांडा तालुक्यातील एका गावात नातेवाईकाच्या घरी लपून बसलेला हाेता. 263 काेटी 60 लाख रुपयांचे व्यवहारावरील 52 काेटी 19 लाख रुपयांचा जीएसटी कर बुडवून त्याने गैरव्यहार केल्याचे जीएसटी विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

तुषार मुनाेत हा मुळचा साेलापूर जिल्हयातील असून पुणे येथे सध्या व्यवसायिक म्हणून कार्यरत हाेता. कागदाेपत्री 5 बाेगस कंपन्या स्थापन करुन त्याने व्यवहारासाठी बनावट कंपन्याचे इनव्हाईस तयार करुन ते स्वत:चे कंपन्याचे खात्यावर पैसे देताना जीएसटीचा भरणा केला असे भासवत हाेता.

बँकांच्या माध्यमातून संबंधित पैसे काढून पैसे भरणा करणाऱ्यांना त्यांचे कमिशन देऊन उर्वरित रक्कम स्वत:चे फायद्याकरिता वापरत हाेता. बँकांची दिशाभूल करुन त्याने अनेक बँकेचे कर्ज ही घेतलेली आहे. अशाप्रकारे त्याने काेणत्याही कंपनी मार्फेत वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता केवळ कागदाेपत्री कोटयावधी रुपयांचा गैरव्यवहार केला.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश याठिकाणी त्याचे व्यवसायाचे रॅकेट विस्तारलेले हाेते. काेणत्याही प्रकारची वस्तू-सेवाचा पुरवठा न करता त्याने बनावट कंपन्याचे माध्यमातून जीएसटी विभागाची फसवणुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

जीएसटीच्या गुप्तचर पथकास मिळाल्यानंतर त्याच्या संर्दभात माहिती आणि पुरावे गाेळा करण्यात आल्याचे जीएसटी गुप्तचर पुणे विभागाचे जाॅइंट डायरेक्टर सुहेल काझी यांच्या पथकाने ही कारवाई केली. मुनोतला गुरुवारी पुणे न्यायालयात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमाेर त्याला हजर केले असता, न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या