दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

स्वारगेट परिसरातील आनंदपार्क मधील वृंदावन सोसायटीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

अनिल उर्फ जॉन्टी सुनील कांबळे (वय – 27),  अक्षय उर्फ मयूर मनोज कांबळे (वय – 26), हैदर रहीम मिर्झा (वय – 26), शिवप्रसाद उर्फ मेंढ्या महादेव धेंडे (वय – 24, सर्व रा. गुलटेकडी) आणि आदित्य सुरेश पवार (वय – 19, रा. पर्वती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास स्वारगेट पोलिस पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मातोश्री कै. गयाबाई वैरागे उद्यानाजवळ काहीजण वाद घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अनिल, अक्षय, हैदर, शिवप्रसाद, आदित्यला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पालघन, बेसबॉल दांडके, कटावणी आढळून आली.

चौकशीत त्यांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, सचिन कदम, रामचंद्र गुरव, पंढरीनाथ शिंदे, विजय कुंभार, विजय खोमणे, सचिन तनपुरे, सचिन दळवी, ज्ञानेश्वर बडे, शंकर गायकवाड, संदीप साळवे, सोमनाथ कांबळे, तुषार भोसले, समाधान धनवे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या