सर प्रपोज करूनही मला नकार येत आहे, तरूणाच्या प्रश्नावर पोलीस आयुक्तांची गुगली हिट!

सर मी एका तरूणीला प्रपोज केले आहे. मात्र, ती मला आपण फक्त चांगले मित्र असल्याचे सांगत आहे. आपण माझ्यासाठी काहीतरी करा ना, अशाप्रकारे तरूणाच्या प्रश्नावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तरूणीचा नकार असल्यास नो मीन्स नो असे अफलातून उत्तर देत पुणेकरांची मने जिंकली आहे. लेट्स टॉक सीपी पुणे कार्यक्रमात त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

ट्वीटरवर आयोजित लाईव्ह चॅटमध्ये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. विशेषतः त्यांनी महिला सुरक्षा, वाहतूक नियमन, मास्कची कारवाईबद्दल उत्तरे देत पुणेकरांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान लॉईव्ह चॅटमध्ये एका तरूणाने त्याच्या प्रेमातील अडथळ्यांची समस्या आयुक्तांना सांगत पर्यायी मार्ग सुचविण्यासाठी विनंती केली.

त्यावेळी पोलीस आयुक्त गुप्ता यांनी तरूणाची फिरकी घेत, जर मुलीची इच्छा नसेल, तर तू काहीही करू नकोस, आम्हीही काही करणार नाही. मात्र, आमच्या शुभेच्या नेहमीच तुझ्यासोबत आहेत, असे हजरजबाबी उत्तर देत मिश्लील टिपण्णी केली. लेट्स टॉक सीपी कार्यक्रमात तब्बल 14 लाख 78 नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यासोबतच 150 ते 200 नागरिकांनी पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारले. त्यातील 25 ते 30 प्रश्नांना त्यांनी तत्काळ उत्तरे देऊन नागरिकांची मने जिंकली.

सोशल मीडियामुळे अल्पवयीनांमध्ये भाईगिरीचे पेव

अल्पवयीन मुलांना भाई आणि डॉनचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जात असल्याबद्दल नागरिकांनी प्रश्न विचारले असता, पोलीस आयुक्तांनी सोशल मीडियामुळे अल्पवयीन मुलांचा ओढा गुन्हेगारीकडे वाढला आहे.

त्यासाठी शाळा-महाविद्यालयात मुलांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय मुलांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या