पुणे जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडणार – पोलीस अधीक्षक डॉ. अभिवन देशमुख

औद्योगिकीकरणामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणांवरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारीतही वाढ झाल्यामुळे येत्या काळात संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यास पाहिले प्राधान्य देणार असल्याची माहिती पुण्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशमुख म्हणाले, महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला लवकर अटक करणे. त्यासह तपास करून दोषारोपपत्र न्यायलयात पाठवून दाखल गुन्ह्यामध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठा असून शहरीकरणामुळे वाहतुकीचे प्रश्न वाढत आहेत. वाहतुकीचे व्यवस्थापन करणे आणि नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळायला लावण्यावर भर दिला जाणार आहे.स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल डिस्टन्सवर भर देणार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत जगजागृती करण्यात येत आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी बेशिस्तांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड प्रादुर्भाव रोखण्यावर भर दिला जाणार आहे. मास्क न वापरणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करणे, जनता कर्फ्यू, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना सोशल डिस्टनसिंग पाळायण्यास बंधनकारक केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या