पुणे : पोलीस असल्याचे सांगून हॉटेलमध्ये फुकट जेवले, तिघांना अटक

1244

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तोतया अधिकारी आणि पोलीस असल्याचे सांगून हॉटेलमध्ये फुकट जेवण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. इंदापूर तालुक्यातील मदनवाडी चौफुला-भिगवण येथील अशोका लॉज इथे हा प्रकार घडला.

सागर शहाजी पवार, कुलदीप बाळकृष्ण कांबळे (रा.लाखेवाडी, ता.इंदापूर, जि.पुणे) आणि नवनाथ (रा.दौंड, जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लॉजचालक रामण्णा चन्नकेशवा (रा.मदनवाडी, ता.इंदापूर, जि.पुणे, मूळ रा.केंजूर, ता.उडपी, कर्नाटक) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती.

अटक केलेल्या तिघांनी अशोका लॉजमध्ये ‘रुम पाहिजे’ असे विचारले. फिर्यादी चन्नकेशवा यांनी रुम नसल्याचे सांगितले. त्यामुळे ‘तुम्ही मला ओळखत नाही का ? मी राज्य उत्पान शुल्क विभागाचा अधिकारी आदित्य पवार आहे’ असे सांगितले यावेळी त्याच्या साथीदारांनी ‘आम्ही पोलीवाले आहोत. आमच्या साहेबांना फोन करतो’ असे सांगून लॉजमध्ये पैसे न देता जेवण करून फसवणूक केली. पोलिसांनी या तिघांकडील दुचाकी जप्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या