एल्गार परिषदेप्रकरणी दिल्लीत पुणे पोलिसांची छापेमारी

333
police

एल्गार परिषदभीमा कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांनी मंगळवारी दिल्लीत छापेमारी केली. दिल्ली किद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू यांच्या नोएडा येथील घराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांनी बाबू यांच्या ताब्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेतल्या. एल्गार परिषदेतील सहभागाच्या संशयावरून पुणे पोलिसांनी नोएडा पोलिसांच्या मदतीने बाबू यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी जप्त केलेल्या वस्तू न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या असून त्याचा अहवाल मिळाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या