महिलेचा फोननंबर मागणाऱ्या युजरला ‘असे’ दिले पुणे पोलिसांनी उत्तर

पुणे पोलिसांचे एक ट्विट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ट्विटरवर महिलेचा नंबर मागणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पुणे पोलिसांनी दिलेले हे हजरजवाबी उत्तर चांगलेच व्हायरल होत आहे.

रविवारी एका महिलेने पुणे पोलिसांच्या ट्विटर अंकाऊटला टॅग करुन धानोरी पोलीस ठाण्याचा नंबर मागितला होता. या नंबरची तातडीने गरज असल्याचे तिने म्हटले होते. पुणे पोलिसांनी त्या महिलेला पोलीस ठाण्याचा नंबर पाठवला. त्यानंतर एका ट्विटर युजरने ‘मला त्या महिलेचा नंबर मिळू शकेल का?’ अशी विचारणा केली. Abirchiklu नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन हा रिप्लाय आला होता. पोलिसांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत त्याची बोलती बंद केली. सर, याक्षणी आम्हाला तुमचा नंबर जाणून घेण्याची गरज वाटत आहे. तुम्हाला एखाद्या महिलेच्या नंबर का हवा आहे, हे आम्हांला जाणून घ्यायचे आहे’. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधू शकता, असा उपरोधिक सल्ला देत तुमची ओळख सार्वजनिक केली जाणार नाही, असेही पुणे पोलिसांनी पुढे म्हटले आहे.

पुणे पोलिसांच्या या उत्तराने सोशल मीडियावर अनेकांनी या युजरला चांगलेच ट्रोल केले. पुणे पोलिसांनी दिलेले उत्तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुणे पोलिसांच्या या हजरजबाबीपणाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या