चंदनचोराला 14 वर्षांनी अटक, वानवडी पोलिसांची कामगिरी

चंदनचोरीच्या गुन्ह्यात तब्बल 14 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रताप आप्पा मिसाळ (वय 38, रा. वेळापूर, माळशिरस ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार सोमनाथ महादेव साठे आणि बाळू नारायण धोत्रे यांना यापुर्वीच अटक करण्यात आले आहे.

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रिन्स ऑफ वेस्ट ड्राईव्ह बंगल्याच्या आवारातून जून 2007 मध्ये चंदनाच्या झाडाची चोरी केली होती. याप्रकरणी सोमनाथ साठे आणि बाळू धोत्रे यांना अटक करण्यात आली होती. मात्र, तिसरा आरोपी 14 वर्षांपासून फरार झाला होता. वानवडी पोलिसांनी तपास करून प्रताप मिसाळ याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुरव, ज्ञानदेव गिरमकर, शिरीष गोसावी यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या