नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल 

614

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने हे आरोपपत्र पुण्याच्या सत्र न्यायालयात दाखल केले आहे. सध्या संजीव पुनाळेकर हे जामिनावर बाहेर असून, विक्रम भावे हे तुरुंगात आहेत.

संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरूद्ध दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीव पुनाळेकर दाभोलकर हत्येच्या संपूर्ण कटात सहभागी असल्याचे सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. संजीव पुनाळेकर यांनी शरद कळसकर याला दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी वापरलेले हत्यार नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असा सीबीआयचा आरोप आहे. दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या दोन शूटरमध्ये शरद कळसकर ही होता. शरद कळसकर याने त्यांचे वकील संजीव पुनाळेकर यांचा सल्ला स्वीकारत ठाणे येथील नाल्यात चार पिस्तूल फेकल्याचा दावा सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या