देशभरात एक हजार क्रीडा निपुणता केंद्रे उभारणार – किरेन रिजिजू

2028च्या लॉस एंजिल्स ऑलिंपिकमध्ये हिंदुस्थानला पदकतालिकेत टॉप-10मध्ये यायला हवे, असे माझे स्वप्न आहे. मात्र हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी स्थानिक पातळीपासून खेळाडूंची निवड करीत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. देशातील 700 जिह्यांमध्ये सुमारे एक हजार ‘खेलो इंडिया निपुणता केंद्रे’ उभारण्याची आमची योजना असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी केले.

केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, स्पोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या विभागीय संचालिका सुश्मिता जोत्सी आदी उपस्थित होते.

किरेन रिजिजू पुढे म्हणाले, ‘हिंदुस्थानसारख्या देशात क्षमता असूनदेखील त्याचे संधीमध्ये रूपांतर करण्यात आपण कमी पडतो. हेच लक्षात घेत अगदी स्थानिक पातळीवर खेळाडूंच्या क्षमता ओळखत त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन स्पर्धेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने देशभरात खेलो इंडिया निपुणता केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या