पुणे: नाटककार गडकरींचा पुतळा हटवला

37

सामना ऑनलाईन । पुणे

लाईक कराट्विट करा

पुण्याच्या जंगली महाराज मार्गावरील संभाजी उद्यानात असलेला नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा मध्यरात्री अडीचच्या सुमारास हवण्यात आला. तब्बल १५ जणांनी मिळून चबुतऱ्यावरुन पुतळा काढला आणि मुठा नदीत फेकून दिला.

आचार्य अत्रे यांच्या हस्ते २३ जानेवारी १९६२मध्ये नाटककार गडकरींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेला हा पुतळा राम गणेश गडकरी स्मारक समितीने पुणे महापालिकेला भेट दिला होता.

राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतला होता. त्यामुळे पुतळा हटवण्यामागे संभाजी ब्रिगेडचा हात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या