
झेब्रा क्रॉसिंगवर दुचाकी थांबवल्यामुळे दंडात्मक कारवाईसाठी वाहतूक महिला कर्मचाऱ्याने फोटो काढण्याच्या रागातून त्यांचा हात पिरगळणाऱ्या महिलेला मुंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मुंढवा चौकात घडली. अनुया सोदे असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक ए.ए. दिवेकर यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी महिला पोलीस कर्मचारी दिवेकर मुंढवा चौकात वाहतूक नियमन करीत होत्या, त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या अनुयाने दुचाकी झेब्रा क्रॉसिंगवर उभी केली. दिवेकर यांनी त्या महिलेचा फोटो काढून कारवाईचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्यामुळे अनुयाने दिवेकर यांचा हात पिरगाळून अपशब्द वापरले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रेजितवाड तपास करत आहेत
आपली प्रतिक्रिया द्या