येरवड्यात 6 दुचाकींना पेटवले, तीन संशयित ताब्यात

bike-fire

येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींची तोडफोड करून जाळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यामध्ये 6 दुचाकींचे नुकसान झाले असून, 3 संशयितांना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी सोमनाथ गायकवाड (वय 35) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लक्ष्मीनगर हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे स्थानिक नागरिक वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. काल मध्यरात्री टोळक्यानी दशहत माजवत गोंधळ घातला. परिसरातील दुचाकींची तोडफोड करत 6 दुचाकी पेटवून दिल्या. त्यामध्ये 2 दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर 4 दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले आहे. हा प्रकार समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तणाव देखील निर्माण झाला आहे. माहिती मिळताच सहाययक निरीक्षक बलभीम ननावरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या