‘मित्राला जुलाब होतायत’, ‘कालच पावती केली राव’, पोलीस कारवाई टाळण्यासाठी पुणेकरांची भन्नाट कारणे

>> नवनाथ शिंदे

पुणे- शाब्दिक कोट्या करण्यात पुणेकरांचा हात कोणी धरणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्बधांची कडक अमंलबजावणी करणाऱ्या पोलिसांनाही अनेकांकडून भन्नाट कारणे सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले आहे . त्यामुळे नाकाबंदीत नागरिकांची कारणे ऐवूâन हसावे की त्यांना कारवाई न करताच सोडून द्यावे, अशी द्विधा अवस्था पोलिसांची झाली आहे.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाईचे निर्बध लागू करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनचालकांकडे तपासणी केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र, कारवाईच्या तडाख्यातून वाचण्यासाठी पुणेकरांकडून कल्पना शक्तीचा पुरेपुर वापर करीत भन्नाट कारणे सांगितली जात आहेत. अहो साहेब छातीत दुखतंय म्हणून औषधे आणायला चाललोय, दळणाचा डबा गिरणीत अडकला आहे, घरातील भाजी संपलीय, साहेब कोपNयावर माझं घर आहे, मित्राला जुलाब होतायेत, गोळ्या घ्यायला चाललोय, कालच पावती केली राव विनामास्कची, आज नका करू राव, घरात करमत नाही म्हणून आताच बाहेर आलोय, साहेब गाडी लावून घ्या, पण कारवाई करू नका, वडिलांसाठी औषध आणायला चाललोय, गॅस संपलाय आणायला निघालोय, अशारितीने अनेकांकडून कारणे सांगितली जात आहे. त्यामुळे कारवाई करताना पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कारवाई टाळण्यासाठी गल्ली बोळातून प्रवास

नाकाबंदीदरम्यान पोलिसांकडून कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांकडून गल्ली-बोळातून खुष्कीचा मार्ग काढला जात आहे. ठराविक वेळेत कारवाईची शक्यता लक्षात घेउन अनेक टवाळखोरांकडून वाहतूकीचा मार्ग बदलला जात असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः ट्रीपलसीट प्रवास करणारे, विनामास्क भटवंâती, विनाकारण प्रवास, मित्रांसोबत फिरण्यासाठी काहीजणांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. मात्र, संबंधितांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासाठी चौकाचौकातील पोलिसांकडून प्राधान्य दिले आहे.

कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे नियमांची कठोरपणे अमंलबजावणी केली जात आहे. मात्र, नाकाबंदीत अनेकांकडून हास्यास्पद कारणे सांगितली जात आहेत. प्रामुख्याने वैद्यकीय आणि भाजीपाली, किराणा माल खरेदीसंदर्भात कारणे सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याशिवाय नातेवाईकाच्या मयतीला चालले आहे, आत्ताच अंत्यसंस्कार करून आलोय अशीही कारणे सांगितली जात आहेत. – श्रीकांत सावंत, पोलीस उपनिरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे

आपली प्रतिक्रिया द्या