शेजारणीला फ्लाईंग किस करणे पडले महाग, झाला तीन वर्षाचा तुरुंगवास

1409

सामना ऑनलाईन। मोहाली

पंजाबमधील मोहाली येथे विवाहीत शेजारणीला फ्लाींग किस करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. न्यायलयाने त्याला तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

तरुणाचे नाव विनोद असून त्याच्या शेजारी राहणारी महिला त्याला आवडत होती. ती जेव्हा जेव्हा बाल्कनीत यायची तेव्हा तेव्हा तो तिला बघून फ्लाईंग किस करायचा. महिलेने अनेकवेळा याकडे दुर्लक्ष केले. शेवटी वैतागून तिने पतीला याबद्दल सांगितले. त्यानंतर त्यानेही तरुणाला सज्जड दम दिला. पण तरीही तरुणाचे वेडेचाळे सुरुच होते. तो येता जाता तिची छेडछाड करायचा.टोमणे मारायचा. यामुळे महिलेच्या पतीने त्याला चोपही दिला . पण तरुणात काहीही सुधारणा झाली नाही. शेवटी महिलेच्या पतीने तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. हे प्रकरण न्यायालयात गेले असता न्यायालयाने त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या