पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मारेकऱ्याला फाशीऐवजी जन्मठेप

549

पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचा मारेकरी बलवंतसिंह राजोआना याला फाशीऐवजी जन्मठेप देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश केंद्रीय गृह खात्याने पंजाब सरकारला दिले आहेत. पंजाबमध्ये 31 ऑगस्ट 1995 साली चंदिगड सचिवालयाबाहेर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची हत्या घडवून आणण्यात आली. त्यांची गाडी बॉम्बस्फोटाने उडवून देण्यात आली. बॉम्बस्फोटात आणखी 16 जण ठार झाले. या प्रकरणात 2007मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने राजोआनाला फाशीची शिक्षा सुनावली. 2017 मध्ये राजोआनाच्या बहिणीने त्याची फाशी रद्द करावी आणि त्याचे रूपांतर जन्मठेपेत करावे अशी याचिका पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या