कोरोनाग्रस्त रुग्णाचा रुग्णालयात डान्स; पाहा व्हिडीओ

922

कोरोनाच्या कहरातून संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना एक आगळावेगळा व्हिडीओ समोर आला. या व्हिडिओत कोरोना ग्रस्त रुग्ण चक्क डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पंजाब मधील जालंदर येथील रुग्णालयातील आहे. येथे काही कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांना आयसोल्युशन मध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी रुग्णालयात पंजाबी गाणे वाजवली असता सर्व रुग्णांनी नाचण्यात सुरुवात केली.

आकाश सिंह यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, ‘हा व्हिडीओ पंजाब मधील जालंदर येथील सिव्हिल रुग्णालयात 19 एप्रिल 2020 रोगी रेकॉर्ड करण्यात आलेला आहे.’ या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की सर्व रुग्णांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क घातलेला आहे. हे सर्व रुग्ण सामाजिक अंतर पाळून आपापल्या खाटेवर नाचत आहेत.

रुग्णालयाचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी काश्मिरी लाल यांनी याबाबत बोलताना सांगितले की, कोरोनाचे रुग्ण लवकरच बरे होऊन आपापल्या घरी जातील. त्यांच्या वॉर्डमध्ये एक टीव्ही बसवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये संक्रमित रुग्ण स्वत: च्या खाटेवर नाचत आहेत आणि सामाजिक अंतर पाळत आहेत. यासोबतच त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. या व्हिडिओने एक नवीन उमेद निर्माण केली आहे. चिंता करून काहीही होणार नाही, आपण आनंदी राहूनही या महामारीचा सामना करू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या