पंजाबमध्ये हाय अलर्ट! पुढील 24 तासात 4 विमानात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

पंजाबमधील लुधियाना विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळावरील मॅनेजरला असा फोन आला असून पुढील 24 तासामध्ये चार विमानांमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकीही फोन करणाऱ्याने दिली आहे. ‘अमर उजाला’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, दोन आठवड्यांपूर्वी पंजाबमधील लुधियाना विमानतळावरील असिस्टंट मॅनेजरला विमानतळ उडवून देण्याची धमकी मिळाली होती. धमकीचा फोन आल्यानंतर विमानतळाची सुरक्षा कडक करण्यात आली असून फोन करणाऱ्याचा शोध सरू आहे. या प्रकरणी विमानतळावरील असिस्टंट मॅनेजर पवन कुमार यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

तक्रारीनुसार, 18 फेब्रुवारीला विमानतळावर सेवा बजावत असताना पवन कुमार यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपले नाव नवदीप उर्फ नवी असे सांगितले. येत्या 24 तासांमध्ये चार विमानांमध्ये बॉम्बस्फोट होईल, वाचवू शकत असाल तर वाचवा, अशी धमकी फोनवरून देण्यात आली. यासोबत विमानतळ उडवून देण्याचीही धमकी देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या