पंजाब महाराष्ट्र को-ऑप. बँक अजिंक्य

37

सामना ऑनलाईन, मुंबई

पंजाब महाराष्ट्र को-ऑप. बँकेने ‘को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई’च्या ५७व्या वर्धापन दिनानिमित्त डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे पुरस्कृत करण्यात आलेल्या आंतर सहकारी बँक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनतर्फे शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नीटनेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली.

आंतर को-ऑप. बँक क्रिकेट स्पर्धेत मुंबई व ठाण्यातील ४८ सहकारी बँकांच्या संघांचा विक्रमी प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली के. टी. कदम, नंदकुमार रेगे, दत्ता कळंबे, हाशम धमसकर, प्रकाश वाघमारे, रवींद्र पावसकर, यदुवीर पुत्रन, नारायण बोरूडे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, जनार्दन मोरे व इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या