नवज्योतसिंग सिद्धू पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, चार कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वादावर, काँग्रेस नेतृत्वावर अखेर पडदा टाकला आहे. सिद्धू यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जोडीला चार कार्यकारी अध्यक्षही देण्यात आले आहेत.

ही बातमी वाचलीत का – ब्राह्मण समाज आता भाजपला मतदान करणार नाही! बसपा अध्यक्ष मायावती यांनी व्यक्त केला विश्वास

कॅप्टन आणि सिद्धू यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी 10, जनपथवर वारंवार बैठका झाल्या. दोघांशीही राहुल आणि प्रियंका गांधी यांनी चर्चा केली. मात्र मार्ग काही निघत नव्हता. पंजाबमध्ये लक्ष घालून नका, असे पत्रही कॅप्टन यांनी दिले होते. अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चतुःसूत्री फॉर्म्युला तयार केला.

ही बातमी वाचलीत का – अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरांवर ‘ईडी’चा छापा

या फॉर्म्युल्यानुसार सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवतानाच कुलजीत नागरा, पवन गोयल, सुखविंदर डॅनी आणि संगत सिंह यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले आहे. सिद्धू यांनी सार्वजनिक माफी मागावी यावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग ठाम आहेत. सिद्धू यांनी 30 आमदार आणि मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर नवी दिल्लीत हालचाली झाल्याचे सांगण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या