पाकड्यांची अशी घुसखोरी, सीमेजवळील गावांमध्ये सोडलं पाणी

1688

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानच्या कुरापती काढणे सुरू ठेवले आहे. याचपार्श्वभूमीवर पाकिस्तानने पंजाब सीमेवरील गावांमध्ये मुद्दाम नद्यांच पाणी सोडले आहे. यामुळे पंजाबशी जोडलेल्या सीमेवरील गावांमध्ये पूर आला असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहे. या भागात शेतीचं ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

पाकिस्तानमधील कुसूर जिल्ह्यातून हे पाणी सोडण्यात आले आहे. सतलज, रावी आणि व्यास या नद्यांचे पाणी पंजाबमधून पाकिस्तानमध्ये जाते. त्यानंतर तेथून ते पुन्हा पंजाबमध्ये येते. यामुळे कुसूर जिल्ह्यातील रावी नदीवर पाकिस्ताननं धरण बांधली आहेत. पण आता पाकिस्तानने सर्व धरणाचे दरवाजे उघडले आहेत. तर दुसरीकडे अनेक नाल्यावर बांधण्यात आलेले बांध तोडले आहेत. यामुळे अडीच लाख क्युसेकहून अधिक पाणी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात शिरलं आहे. अनेक ठिकाणी लावण्यात आलेले तारेची कुंपणेही पाण्यात वाहून गेली आहेत. तर पूराच्या पाण्यात उभी पिकंच वाहून गेल्याने येथील शेतकरी धास्तावला आहे.

याचाच गैरफायदा घेत पूराच्या पाण्यातून टायरचे ट्यूब आणि कोल्ड ड्रिंक्सच्या बाटल्यांमधून पाकिस्तानने अंमली पदार्थ व हत्यारांची तस्करी सुरू केली आहे. मात्र बीएसएफचे जवान दिवस रात्र या भागांमध्ये पेट्रोलिंग करत असल्याने पाकड्यांचे हे मनसुबे अयशस्वी होत आहेत. तर दुसरीकडे हजारो नागरिक पूराच्या पाण्यात अडकले असून पाणी ओसरण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या