उत्तर प्रदेशमध्ये एक्सप्रेसचे १४ डबे घसरले, २३ जणांचा मृत्यू

15

सामना ऑनलाईन । लखनऊ

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये खतौलीजवळ कलिंग-उत्कल एक्सप्रेसला अपघात झाला. पुरीहून हरिद्वारला जात असलेल्या कलिंग-उत्कल एक्सप्रेसचे १४ डबे रुळावरुन घसरले. आज (शनिवारी) संध्याकाळी ५.४६ वाजता झालेल्या या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अपघाताचे स्वरुप पाहता मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

कलिंग-उत्कल एक्सप्रेस घसरल्यानंतर डबे एकमेकांवर आपटले त्यामुळे अनेक प्रवासी डब्यांमध्येच अडकले आहेत. मदतकार्याला सुरुवात झाली असून जखमींना तातडीने रुग्णालयात नेले जात आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत.

#WATCH: Visuals from the train derailment site in Muzaffarnagar’s Khatauli; 6 coaches have derailed. More details awaited #UttarPradesh pic.twitter.com/AiNdfKV7oS

— ANI UP (@ANINewsUP) August 19, 2017

अपघाताचे ठिकाण मुझफ्फरनगर जिल्हा मुख्यालयापासून २५ किमी. अंतरावर आहे. अपघाताचे कारण चौकशीअंती स्पष्ट होईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या