पुण्याची पूर्वा बर्वे बनली चॅम्पियन

12

पुणे :

हिंदुस्थानच्या पूर्वा बर्वे हिने योनेक्स इटालियन कुमार बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरून कारकीर्दीतील सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. मिलान (इटली) येथील ही स्पर्धा पार पडली.

पूर्वाने गेल्याच आठवड्यामध्ये इस्रायल खुल्या स्पर्धेतही विजेतेपद मिळकले होते. आज पूर्वाने आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळकून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. पूर्वाने अंतिम लढतीत स्पेनच्या एलिना ऍण्ड्रय़ूचा केवळ २१ मिनिटांमध्ये २१-९, २१-९ असा सहज धुव्वा उडवून किजेतेपदाला गकसणी घातली. पूर्काने पहिल्या गेममध्ये ८-१ अशी आघाडी घेतली होती पण एलिना ८-१२ अशी आघाडी कमी केली. पण पूर्काने एलिनाला जास्त संधी न देता केकळ एक गुण घालकत हा गेम २१-९ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही पहिल्याच गेमची पुनरावृत्ती झाली. पूर्काने ५-१ अशी आघाडी घेतली क त्यानंतर आपली आघाडी कायम वाढवत २१-९ अशा गुण फरकाने दुसऱ्या गेमसह सामना जिंकला. जागतिक क्रमवारीत ५१ व्या स्थानी असलेल्या पूर्काला स्पर्धेत पाचके मानांकन होते. तिने सलग १२ सामने जिंकत एकही गेम न गमाकण्याचा पराक्रम केला हे विशेष. पुण्यातील निखिल कानिटकर बॅडमिंटन ऍकॅडमीमध्ये पूर्वा सराव करते.

‘इस्रायल येथील स्पर्धेत किजय मिळकल्यानंतर इटली येथील स्पर्धेतही अंतिम फेरी गाठण्याचे माझे ध्येय होते. निखिल सरांनी सांगितलेल्या टीप्स खऱ्या अर्थाने बहुमोल ठरल्या. लागोपाठ दोन आंतराष्ट्रीय स्पर्धेत थेट विजेतेपद जिंकल्याने साहजिच खूप आनंद झाला.’ – पूर्वा बर्वे

आपली प्रतिक्रिया द्या