पुष्पाताई खुबाळकर झाल्या उद्यानपंडीत

34

सामना ऑनलाईन । नागपूर

अनियमित पावसामुळे पिकांच्या उत्पादनावर होणारा विपरित परिणाम आणि त्यामुळे शेती करणे परवडत नाही, ही भावना साधारणत: शेतकऱ्यांमध्ये राहते. शेतीचे अर्थकारण बदलविण्यासाठी पाण्याचा तंत्रशुध्द वापर किती महत्वाचा आहे याचा आदर्श सावनेर तालुक्यातील खुबाळा या गावच्या प्रगतीशिल शेतकरी पुष्पा खुबाळकर यांनी निर्माण केले आहे.

पारंपारिक पध्दतीची शेती न करता त्यासोबत दैनंदिन आवश्यक असलेला भाजीपाला व फळ उत्पादनाची जोड देवून शेतीचे अर्थकारण बदलवू शकते हा आत्मविश्वास घेवून खुबाळयाच्या पुष्पाताई खुबाळकर यांनी गावातील सर्व शेतकरी बांधवांमध्ये निर्माण केला आहे. खुबाळा हे गाव आज भाजीपाला व फळ उत्पादनाचा जिल्हयातील प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत आहे. नागपूरसह संपूर्ण जिल्हयात दररोज सकाळी भाजीपाला पाठविण्याची सुविधा या गावात निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने कृषी विज्ञान केंद्राचे निर्मिती करुन शेतीच प्रगत तंत्रज्ञानाची माहिती या केंद्रातून उपलब्ध करुन दिली जात आहे. पुष्पाताई खुबाळकर यांनी केलेल्या या उपक्रमाची दखल घेऊन शासनानेही त्यांना उद्यानपंडीत पुरस्कार देऊन गौरविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या