सिंधू सिंगापूर ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

19

सामना ऑनलाईन । सिंगापूर

रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी हिंदुस्थानची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सिंगापूर ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली. सिंधूने इंडोनेशियाच्या फित्रानीवर १९-२१, २१-१७, २१-८ असा विजय मिळवला.

जागतिक क्रमवारीत पाचव्या मानांकित सिंधूने क्रमवारीत २७ व्या स्थानी असलेल्या फित्रानीचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मारिनसोबत सिंधूची लढत होणार आहे.

काही दिवसांपूर्वी इंडियन ओपनच्या अंतिम फेरीत सिंधूची कॅरोलिनासोबत लढत झाली होती. यात सिंधूने कॅरोलिनावर मात करुन स्पर्धा जिंकली होती.

आपली प्रतिक्रिया द्या