सिंधू जिंकली, सायना हरली; जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी खेळाडूंसाठी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधला शुक्रवारचा दिवस निराशाजनक ठरला.  सायना नेहवाल, बी साईप्रणीत यांना एकेरीत तर अश्विनी पोनप्पा व सात्विक रेड्डी यांना दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारी पी व्ही सिंधू हिने नोझोमी ओकुहरा हिच्यावर २१-१७, २१-१९ अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पेनच्या कॅरोलिन मरीनकडून सायना नेहवालला ६-२१, ११-२१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. पुरुषांच्या एकेरीच्या लढतीत केण्टो मोमोटोने बी साईप्रणीतला हरवले. हिंदुस्थानचा खेळाडू १२-२१, १२-२१ अशा फरकाने पराभूत झाला. दुहेरीच्या लढतीत अश्विनी पोनप्पा व सात्विक रेड्डी या हिंदुस्थानच्या जोडीला झेंग सुएई व हुयांग याकीओंग या अव्वल सीडेड जोडीकडून २१-१७, २१-१० अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.