पी. व्ही. सिंधूची जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक

438

हिंदुस्थानची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं शनिवारी इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या अंतीम फेरीत तिने धडक मारली. शनिवारी झालेल्या सामन्यात सिंधूनं चीनच्या चेन यू फेई हिचा 21-7, 21-14 अशी पराभव करत सहज विजय मिळवला.

पहिल्या सेटमध्ये सिंधूनं सुरुवातीला आक्रमक खेळ करीत आघाडी घेतली. सिंधूच्या आक्रमक खेळापुढे चीनच्या चेन यू फेईवर दबाव आला. त्यामुळे चेनने बऱ्याच चुका केल्या. तिच्या या चुकाचा अचूक फायदा सिंधूनं उचलला. मध्यांतर होईपर्यंत सिंधूनं 11-3 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर चेनने क्रॉस कोर्ट खेळत गुण मिळवले. मात्र, तिला आघाडी घेण्यात यश आले नाही. तर दुसरीकडे सिंधूनं स्मॅश आणि जबरदस्त कोर्ट कव्हरेज खेळत पहिला सेट आपल्या नावावर केला.

दुसऱ्या सेटच्या सुरुवातील दोन्ही खेळाडूने नेटजवळ खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामना बराच लांबला. सिंधूनं ब्रेकपर्यंत 11-7 अशी आघाडी घेतली होती. चेन यू फेईने ही आघाडी बरोबरी करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, तिला यश आले नाही. अखेर सिंधूने दोन्ही सेटमध्ये तिच्यावर मात करीत मोठ्या दिमाखात अंतीम फेरीत धडक मारली. दरम्यान, सिंधूने सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या