दुबई सुपर सिरिज: सलग तिसऱ्या विजयासह सिंधू उपांत्य फेरीत

सामना ऑनलाईन । दुबई

दुबई सुपर सिरिज स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून हिंदुस्थानची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत (सेमी फायनल) दिमाखात दाखल झाली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सिंधूने दुबई सुपर सिरिज गाजवली. अ गटातून खेळत असलेल्या सिंधूने जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करुन स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला.

सिंधू आणि यामागुची यांच्यात ३६ मिनिटांचा सामना झाला. सिंधूने हा सामना २१-९ आणि २१-१३ असा सलग दोन गेम जिंकून सहज खिशात टाकला. याआधी अ गटातील आपल्या पहिल्या सामन्यात सिंधूने चीनच्या बिंगजियाओ हिचा आणि दुसऱ्या सामन्यात जपानच्या सायाको साटो हिचा पराभव केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या