‘चॅम्पियन’ सिंधूवर कौतुकाचा वर्षाव; पंतप्रधान मोदी, सचिनने केले अभिनंदन

559
पी.व्ही.सिंधू (बॅडबिंटन)- पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकणाऱ्या पी.व्ही. सिंधू हिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करून सिंधूच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. यासह टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने देखील सिंधूच्या विजयानंतर ट्वीट करून तिचे अभिनंदन केले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, क्रीडामंत्री किरण रिंजूजू यांनी केले अभिनंदन

रविवारी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत विजय मिळवत सिंधूने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. अंतिम फेरीमध्ये सिंधूने जपानची नोजोमी ओकुहारा हिचा 21-7, 21-7 अशा दोन सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला.

सिंधूच्या घरी जल्लोष
जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकणारी पहिली हिंदुस्थानी खेळाडू होण्याचा मान पटकावल्यानंतर सिंधूच्या हैदराबाद येथील घरी जल्लोष साजरा करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या