सात महिन्यांनंतर इंग्लंडच्या राणी घराबाहेर पडल्या; मास्क न घातल्याने जोरदार चर्चा सुरू

गेल्या सात महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर इग्लंडच्या राणी एलिझाबेथ अखेर घराबाहेर पडल्या आहेत. कोरोनामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे राणी एलिझाबेथ यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. अखेर सात महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊनला कंटाळून त्या डिफेन्स सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी लॅबोरिटीला भेट देण्यासाठी बाहेर पडल्या. 94 वर्षीय राणींनी यावेळी मास्क परिधान न केल्याने या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोरोना महारामारीमुळे जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन पुकारण्यात आला. यातून इग्लंडची देखील सुटका झालेली नाही. परिणामी इग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांना 21 मार्च 2020 पासून विलगीकरणात ठेवण्यात आले होते. अखेर सात महिन्यांच्या कालावधीनंतर राणी एलिझाबेथ आपल्या बंगल्याबाहेर पडल्या असून नव्या चर्चेला उधाण आले आहे. राणींनी पती प्रिन्स फिलिप आणि नातू प्रिन्स विल्यम्सबरोबर सॅलिसबरीजवळ असलेल्या ‘डिफेन्स सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी’ला भेट दिली. लॉकडाऊननंतर अधिकृतरित्या ही पहिलीच भेट होती. विशेष म्हणजे राणी आणि प्रिन्स विल्यम्स, दोघांनीही मास्क घातलेले नव्हते. त्यामुळे या भेटीने उभ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या