संगीतमय सफर  तीन संपूर्ण दिवस संगीत…

आर4 नॉस्टाल्जिआनाहा झूमच्या माध्यमातून जुन्या आणि नव्या हिंदुस्थानी चित्रपट संगीताशी जोडलेल्या संगीतवेडय़ा कानसेनांचा ग्रुप आहे. आतापर्यंत आभासी माध्यमातून भेटणारे हे संगीतप्रेमी प्रथमच एकत्र आलेनुकताचआर4 नॉस्टाल्जिआनानेम्युझिकल ऑफसाईटहा तीन दिवसांचा कार्यक्रम  गोवा येथे आयोजित केला होता.

व्यक्तिगत कौटुंबिक काळजी, विवंचना सगळं काही विसरून, बाजूला ठेवून तीन दिवस फक्त संगीत ऐकायचे, ऐकवायचे, साठवायचे. याकरिता ‘आर4 नॉस्टाल्जिआना’ने ‘म्युझिकल ऑफसाईट’ हा तीन दिवसांचा भरगच्च निवासी कार्यक्रम इंटरनॅशनल सेंटर ऑफ गोवा येथे आयोजित केला होता. या तीन दिवसांत अनेक जण जे झूमवर फक्त ‘आवाज’ होते त्यांना ‘चेहेरे’ मिळाले, नवीन ओळखी झाल्या, मैत्री झाली. दिवसभर पूर्वावलोकन, परस्पर परिचय, समूहाची पुढील वाटचाल, चर्चासत्र, संगीताशी संलग्न अशा वेगवेगळय़ा विषयांवर समूह सादरीकरण, प्रश्नमंजुषा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

ग्रुपच्या सदस्यांनी सत्तरच्या दशकातली संस्मरणीय गाणी,  पाश्चिमात्य सुरावटींवर आधारित गाणी, गजल, युगल गीत अशा विविध विषयांवरचे अभ्यासपूर्ण विवेचन व सादरीकरण केले. अगदी पहाटेपर्यंत मोकळय़ा हवेत चांदण्यांखाली गप्पा आणि गाण्याचे फड रंगले होते. संगीत रचनेतील गाण्यातील बारकावे उलगडून सांगितले जात होते.

या सर्वात भाग घेऊन सगळय़ा सदस्यांनी रात्रीच्या आपकी फर्माईश, कराओके गायनची आतुरतेने वाट पाहून त्यातही उत्साहाने भाग घेतला. कार्यक्रम इथेच संपला तर नवल. अगदी पहाटेपर्यंत मोकळय़ा हवेत चांदण्यांखाली गप्पा आणि गाण्याचे फड रंगले होते. एकमेकांशी प्रादेशिक संगीताच्या माहितीची देवाण-घेवाण झाली.

तिसऱया दिवसाची अखेर ग्रुप फोटोने झाली. तत्पूर्वी पुढच्या संमेलनाचा जागा व तारखा घोषित केल्या जाण्याचे आश्वासन देण्यात आले. तीन दिवसांचा हा आनंद आणि कृतज्ञता सोहळा होता.

आर-4 नॉस्टाल्जिआना हा आता केवळ एकत्र संगीत ऐकण्याचा मंच राहिला नसून संगीताच्या समान धाग्यांनी जोडलेले आणि सकारात्मक ऊर्जा असलेले एक जागतिक कुटुंब झालंय.  पुढील वाटचालीचे मनसुबे हे या संमेलनाचे महत्त्वाचं फलित. या कुटुंबाचा आवाका वाढविण्याच्या दृष्टीने सगळय़ांनी पुढाकार घेऊन काम करण्याचे ठरवलंय.  संस्मरणीय संग-गीत संमेलनातून संगीताचा प्राणवायू भरून परतल्यानंतरसुद्धा अजून गोव्याच्या गोष्टींची चव अजून सगळय़ांच्या मनात रेंगाळते आहे. पुढील ऑफसाईट्ची चौकशी आणि मनात पुढील ऑफसाईटचा काऊन्ट डाऊन सुरू झाला आहे.