आर. आर. पाटील यांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार योजना

887

ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी विधानसभेत केली. या पुरस्काराचे वितरण दरवर्षी आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाकडून करण्यात येईल.

नोव्हेंबर 2016 पासून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतात. ही योजना आता ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ म्हणून राबविली जाईल. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. तसेच त्यांनी राज्यात ग्रामस्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू करून त्या प्रभावीपणे राबविल्या. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन स्मार्ट ग्राम योजनेस त्यांचे नाव देण्यात येत असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या