कोण आहे ऑस्कर जिंकणारी ‘राधा राणी’ नावाची हॉलिवूड अभिनेत्री? वाचा सविस्तर…

1077

हॉलिवूडच्या चित्रपटांसह अभिनेते, अभिनेत्रींबाबत आपल्याकडे मोठे आकर्षण आहेत. अँजोलिना जोली. केट विसलेंट, ज्युलिया रॉबटर्स, कॅमरन डियाज, पेनिलोपे क्रूज, किरा नाईटली, स्कारटेल जॉन्सन यासारख्या अभिनेत्रींची चित्रपट हिंदुस्थानमध्येही चांगले चालतात आणि त्यांचा मोठा चाहता वर्गही येथे आहे. परंतु हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचे नाव राधा राणी आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? हो, तुम्ही जे वाचले ते अगदी खरे आहे.

हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्रीचे नाव आहे राधा राणी अंबर इंडिगो आनंदा मिशेल (Radha Rani Amber Indigo Ananda Mitchell) असे भले मोठे आहे. आता तुम्हाला वाटेल की हिच्या आई-वडिलांपैकी कोणीतरी अथवा कुटुंबातील एखादा सदस्य हिंदुस्थानचा किंवा हिंदुस्थानी वंशाचा असे म्हणून तिचे नाव राधा राणी ठेवण्यात आले. परंतु हे साफ चुकीचे आहे. राधा राणीचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला. तिचे आई-वडिलही ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत.

‘हाय आर्ट’, ‘पिच ब्लॅक’, ‘फोन बूथ’, ‘मॅन ऑन फायर’, ‘फायंडिंग नेवरलँड’, ‘मेलिंडा ऐंड मेलिंडा’, ‘सायलेंट हिल’ आणि ‘द क्रेजीज’ या चित्रपटामध्ये काम केलेल्या राधा राणीला ‘फायंडिंग नेवरलँड’ या चित्रपटासाठी मानाचा ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटामध्ये केट विंसलेंट आणि जॉनी डेप यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

…असे मिळाले राधा राणी नाव
2010 मध्ये अमेरिकेत झालेल्या ‘इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस ऐंजिलिस’मध्ये राधी राणी हिचा ‘द वेटिंग सिटी’ हा चित्रपट दाखवण्यात आला होता. यावेळी टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना तिने राधा राणी हे नाव कसे मिळाले याबाबत खुलासा केला होता. यावेळी फक्त माझे नावच हिंदुस्थानी नसून मी हिंदुस्थानला माझे दुसरे घर मानते, असे तिने म्हटले होते. राधा राणी नावाबाबत विचारले असता तिने सांगितले की, लहान असल्यापासून मी माझ्या नावाबाबत लोकांना स्पष्टीकरण देत आले आहे. मला असे वाटते गेल्या जन्मी माझे हिंदुस्थानशी काही खास नाते असावे. माझा जन्म झाला तेव्हा माझी आई हिंदुस्थानला गेली होती. हिंदुस्थानी संस्कृती, हिंदू आणि बौद्ध धर्मामुळे ती खुपच प्रभावित झाली. या हिंदुस्थान यात्रेतच माझ्या नावाचे गुपित आहे, असेही ती यावेळी म्हणाली.

राधा राणीचा हिंदुस्थान दौरा
हिंदुस्थानमध्ये कधी आली होती का? असे विचारले असता राधा राणी सांगते की, मी 6 वर्षांची असताना आमचे कुटुंब दिल्लीत आले होते. कौटुंबीक मित्रांशी भेटण्यासाठी आम्ही आलो होतो. हत्ती, घोडे, माकडं , साडी, सिल्क आणि मसाल्याचा सुवास आजही माझ्या नाकात दरवळतो, असेही ती सांगतो. तसेच यावेळी आईला डायरिया झाला होता, अशीही आठवण ती सांगते. दिल्लीनंतर कुंभमेळ्यालाही हजेरी लावल्याचे तिने सांगितले. तसेच 19 वर्षांची असताना कोलकाता ते गोवा रोड ट्रिपद्वारे हिंदुस्थानला आणखीन जाणून घेतल्याचेही राधा राणीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या