Radhe… सलमानचा हटके स्वॅग, नवं पोस्टर रिलिज

salman khan radhe

अभिनेता सलमान खानच्या ‘राधे’चं ( Radhe Your Most Wanted Bhai) टायटल ट्रॅक लवकरच प्रदर्शित होणार आहे. बुधवारी 5 मे रोजी टायटल ट्रॅक प्रीमियर करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी सलमान खानने चित्रपटाचं पोस्टर जारी केलं आहे. ज्यामध्ये सलमान खानने एका गाण्यातील झलक यातून दाखवण्यात आली आहे. सलमानच्या चित्रपटांचं वैशिष्ट आहे की, त्याचे टायटल ट्रॅक हे चांगलेच गाजतात. अनेकदा त्याच्या टायटल ट्रॅकने रेकॉर्ड देखील केले आहेत. राधेच्या टायटल ट्रॅककडे त्यामुळेच साऱ्यांच लक्ष लागलं आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक झलक शेअर करण्यात आली होती ज्याची प्रचंड चर्चा रंगली. साजिद-वाजित यांच्या कल्पकतेतून हे गाणं साकारलं असून साजिदनं त्याला आवाज दिला आहे. तर मुदस्सर खानने कोरियोग्राफी केली आहे. हे गाणं एनर्जीनं भरलं असून तरुणांना आवडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सलमानचा एक निराळाच स्वॅग यामध्ये दिसत आहे. सलमानचे चाहते गाणं पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या