सोशल मीडियामुळे दहशतवाद वाढला!: लष्करप्रमुख

36

सामना ऑनलाईन । बेळगाव

सोशल मीडियामुळे दहशतवाद वाढला, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे झालेल्या शानदार समारंभात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते २३ आणि २४ मराठा बटालियनला राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.

सोशल मीडियाद्वारे अनेकदा दिशाभूल करणारी माहिती वेगाने पसरते. ही माहिती वाचून, पाहून किंवा ऐकून माथी भडकल्याने तरुणांकडून चुका होतात. दहशतवादी कारवाया वाढतात, असे रावत यांनी सांगितले. सैन्य आणि आधुनिक उपकरणे यांचा मेळ साधून दहशतवाद आणि घुसखोरीच्या समस्यांना आळा घालता येऊ शकेल, असे ते म्हणाले. जम्मू-कश्मीरविषयी बोलताना त्यांनी तो देशाचा अविभाज्य भाग आहे आणि हिंदुस्थानचाच राहणार असे सांगितले. डोकलाममध्ये आपले आणि त्यांचे सैन्य आपापल्या हद्दीत असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या