राफेल प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात, पुनर्विचार याचिका दाखल

supreme-court

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राफेल प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रसिद्ध विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी पुनर्विचार याचिका आज दाखल केली. 14 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणातील सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या. राफेल करारात अनियमितता झाली नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. दरम्यान, राफेल प्रकरणात घोटाळा झाला यावर विरोधक ठाम आहेत. राफेल करारावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयात अनेक त्रुटी आहेत. सरकारने दिलेल्या चुकीच्या माहितीवर आधारित न्यायालयाचा निर्णय आहे. सरकारने कोणाच्याही सही शिक्क्याशिवाय बंद लिफाफ्यात माहिती दिली. हा नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचा भंग असून राफेल कराराची सखोल चौकशी झाली पाहिजे असे पुनर्विचार याचिकेत स्पष्टपणे म्हटले आहे.