पाच राफेल फ्रान्सहून रवाना! साडेसात हजार किमी प्रवास करून बुधवारी हिंदुस्थानात पोहोचणार

588

संपूर्ण देश ज्याच्या आगमनाकडे डोळे लावून बसला आहे ते राफेल लढावू विमान फ्रान्सहून हिंदुस्थानकडे झेपावले आहे. साडेसात हजार किमीचा प्रवास करून पाच राफेल विमानांचा ताफा बुधवारी हिंदुस्थानात पोहोचणार आहे. विश्रांतीसाठी काही काळ हा ताफा सौदी अरेबियामध्ये थांबणार आहे. विशेष म्हणजे प्रवासात राफेल हवेतच इंधन भरून घेणार आहे.

rafale-fighter-planes-in-france

फ्रान्सकडून खरेदी करण्यात येणाऱ्या राफेल लढावू विमानांची पहिली खेप 29 जुलै रोजी हिंदुस्थानात दाखल होणार आहे. सोमवारी फ्रान्सच्या मेरिनेक विमानतळावरून पाचही राफेल विमानांनी एकाच वेळी हिंदुस्थानकडे झेप घेतली.

rafale-in-france

यावेळी फ्रान्समधील हिंदुस्थानचे राजदूत जावेद अश्रफ जातीने उपस्थित होते. त्यांनी विमान चालवणाऱ्या हिंदुस्थानी पायलटचे खास अभिनंदन केले. विमानासोबत फ्रान्सचे प्रशिक्षित पायलट असून हिंदुस्थानपर्यंत ही विमाने हिंदुस्थानी पायलटच चालवणार आहेत. पायलटला विश्रांती देण्यासाठी राफेलचा ताफा काहीकाळ सौदी अरेबियामध्ये थांबणार आहे.

अंबाला हवाईतळावर तैनात

राफेल विमानांची तैनाती अंबाला येथील वायूदलाच्या हवाईतळावर करण्यात येणार आहे. अंबाला हवाईतळावरून पाकिस्तान व चीन दोन्ही सीमा राफेलच्या टप्प्यात येतात. राफेलची तैनाती होण्याअगोदरच अंबाला हवाईतळ ‘नो ड्रोन’ परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याचबरोबर हवाईतळाच्या परिसरात विनापरवानगी घुसल्यास थेट गोळी घालण्यात येणार आहे. मिराज 2000 हिंदुस्थानात आले तेव्हा बऱ्याच ठिकाणी थांबत थांबत आले होते. पण राफेल मात्र फक्त एकाच ठिकाणी विश्रांतीसाठी थांबणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या