नदाल, ओपेलका उपांत्य फेरीत; इटालियन ओपन टेनिस स्पर्धा

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू रफाएल नदाल व अमेरिकेचा 23 वर्षीय युवा खेळाडू रिअली ओपेलका या टेनिसपटूंनी शुक्रवारी दमदार कामगिरी करीत इटालियन ओपन या टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली. आता उद्या या दोघांमध्ये सेमी फायनलची लढत रंगणार आहे.

रफाएल नदाल याने अॅलेक्झॅण्डर झ्वेरेव याचे कडवे आव्हान 6-3, 6-4 अशा फरकाने परतवून लावत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. या लढतीत रफाएल नदालने फक्त एक एसेस मारला असला तरी दुहेरी चुका त्याने केल्या नाहीत. अॅलेक्झॅण्डर झ्वेरेव याच्याकडून तीन दुहेरी चुका घडल्या.

पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक

रिअली ओपेलका याने पुरुष एकेरीच्या लढतीत जबरदस्त कामगिरी करताना पहिल्यांदाच मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याने अर्जेंटिनाच्या फेडरिको डेलबोनिस याला 7-5, 7-6 अशा फरकाने हरवले आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला.

फ्लिस्कोवा, मार्टिकची आगेकूच

महिला एकेरीच्या लढतीत कॅरोलिना फ्लिस्कोवा हिने येलेना ओस्तापेन्को हिच्यावर 4-6, 7-5, 7-6 अशा फरकाने विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. अन्य लढतीत पेट्रा मार्टिक हिने जेस्सीका पेगुला हिला 7-5, 6-4 असे हरवत पुढे पाऊल टाकले.

 

आपली प्रतिक्रिया द्या