अनुराग कश्यपने तुंबाडचे नॅरेशन असे सुचवले होते, वाचा दिग्दर्शक राही बर्वेंची पोस्ट

सामना ऑनलाईन । मुंबई

राही बर्वे दिग्दर्शित तुंबाड हा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. परंतु या चित्रपटाच्या निर्मितीची कथाही एका चित्रपटाला लाजवेल अशी आहे. अनेक वर्षे राहींनी अनेक निर्मात्यांना ही कथा ऐकवली परंतु निर्मिती करण्यास कोणीच धजावत नव्हता. अनेकांनी हा चित्रपट हिंदुस्थानी प्रेक्षकांसाठी नाहीच, तु हॉलिवूडला ही कथा विकावी असा सल्लाही काहींनी दिला होता. अनुराग कश्यपने यात भरपूर मदत केली असे राहीने एका मुलाखातीत म्हटले होते. निर्मात्यांना या चित्रपटाचे नॅरेशन नेहमीसारखे देऊ नका असा सल्ला अनुराग कश्यपने राहींना दिला होता. तसेच नेमकी कथा काय सांगायाची हे सुद्धा अनुरागने सांगितले. एक फेसबुक पोस्ट टाकून राहीने त्या आठवणींना उजाळा दिला आहे.

शेवटी कथेमध्ये फेरफार न करण्याचा निर्णय राहीने घेतला. आणि त्याच्या मनाला वाटेल तसाच सिनेमा त्याने घडवला. आता राही बर्वे आपल्या तीन आगामी चित्रपटांवर काम करत आहे. मयसभा, अश्वलिंग आणि रक्तभ्रमांड अशी चित्रपटांची नावे आहेत. मयसभा चित्रपटाचे काम संपले आहे, अश्वलिंग चित्रपटाचे काम सुरू होणार आहे, तर रक्तभ्रमांड चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम नुकतंच सुरू झाल्याचे त्याने आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होते.