महाराष्ट्राच्या राहीबाई पोपरे, पोपटराव पवार व सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर

780

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील मानाचे नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रातील सीड मदर म्हणून ओळख असणाऱ्या राहीबाई पोपरे, नगर जिल्ह्यातील आदर्श गाव ठरलेल्या हिरवे बाजाराचे माजी सरपंच पोपटराव पवार व प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या राहिबाई यांना संकरित बियांणांचा वाढता वापर मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी पारंपारिक बियाणांचं संकलन करत त्यांची एक बँक तयार केली. त्यांनी बियाणांची एक बँक तयार केली असून तब्बल 54 पिकांचे 166 जातींचे वाण त्यांच्या बँकेत आहेत. त्यांच्या या कार्याची जगभरातील प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आहे.

नगर जिल्ह्यातील दुष्काळी गाव असेलेल्या हिरवे बाजार ला माजी सरपंच पोपटराव पवार यांनी एक आदर्श गाव करून दाखवलं. ते पाणी फाऊंडेशनसाठी देखील काम करतात. त्यांनी हिरवे बाजारसाठी केलेल्या कामची देखील जगभरात चर्चा झाली होती.

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने गेली 42 वर्ष मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. द्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुरेश वाडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. आपल्या संगीत कारकिर्दीत लतादीदी आणि आशादीदींचा आशीर्वाद असल्याची कृतज्ञ भावना वाडकर यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या