टीम इंडियाचा क्रिकेटपटू अडकणार लग्नबंधनात, केला साखरपुडा

2496

टीम इंडियाचे खेळाडू रिषभ पंत व हार्दीक पांड्या यांच्या अफेयरच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र या दोघांना मागे टाकत टीम इंडियाच्या नवोदित खेळाडू राहुल चहरने त्याची गर्लफ्रेंड इशानीसोबत साखरपुडा केला आहे. हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

राहुल व दीपक चहर हे दोघे भाऊ सध्या टीम इंडियासाठी खेळत असून या दोन्ही भावांनी आयपीएलचा यंदाचा सिझन गाजवला होता. राहुल हा स्पिनर असून वेस्ट इंडिज विरोधात त्याने आपला पहिला आंतराराष्ट्रीय सामना खेळला होता. राहुलच्या साखरपुड्याचे काही फोटो त्याचा भाऊ दीपक चहरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या