‘चौकीदार चोर हैं’ प्रकरणी राहुल गांधी यांनी मागितली बिनशर्त माफी, खटला बंद करण्याची न्यायालयाला विनंती

169
rahul-gandhi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आता सर्वोच्च न्यायालयालाही मान्य आहे की ‘चौकीदार चोर हैं’ असे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. ‘चौकीदार चोर हैं’ ही घोषणा भाजपवर टीका करताना पक्षाकडून दिली गेली होती. ही घोषणा चुकून कोर्टाच्या आदेशासोबत जोडल्याचे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिले आहे. याप्रकरणी 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, परंतु त्याआधीच राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात तीनपानी प्रतिज्ञापत्र सादर करून बिनशर्त माफी मागितली असून हा खटलाच आता बंद करावा अशी विनंतीही केली आहे. याप्रकरणी 10 मे रोजी सुनावणी होणार होती, परंतु त्याआधी राहुल यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त माफी मागितली.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या पुतळय़ाचे दहन केल्याची घटना आज गुवाहाटीमध्ये घडली. मंगळवारी पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि आसामचे अर्थमंत्री हिंमत बिसवा सर्मा यांच्या ताफ्यावर पूर्व मिदनापूर येथे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर आज भाजप कार्यकर्त्यांनी गुवाहाटीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पुतळय़ाचे दहन करून संताप व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या