राहुल गांधींनी रद्द केल्या पश्चिम बंगालमधील सभा

देशात कोरोनाचा कहर वाढत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु असताना राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठय़ा गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा, असे राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या