राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेणार

879
rahul-gandhi

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. ते राज्यात काही ठिकाणी रोड शो देखील करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी नेमके कुठे आहेत, आणि ते काय करीत आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.

राहुल गांधी पक्ष सांभाळू शकत नाही तर देश काय सांभाळणार- आठवले

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होत असून 21 ऑक्टोबरला मतदान होत आहे तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी  होणार आहे. शिवसेना भाजप आणि मित्र पक्षांच्या महायुतीने राज्यात प्रचाराचा जबरदस्त  झंझावात निर्माण केला आहे. महायुतीसमोर उभ्या असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील अनेक मातब्बर नेत्यांनी त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे ज्यामुळे या आघाडीचा शक्तिपात झाला आहे. अशा या आघाडीच्या प्रचारासाठी राहुल गांधी महाराष्ट्रात येणार आहेत.

राहुल गांधी हे महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणामध्ये देखील प्रचार करणार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये राहुल गांधी 10 ते 19 ऑक्टोबरदरम्यान प्रचार करणार आहेत. हरयाणामध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणेच विधानसभा निवडणूक होत असून तिथेही 24 ऑक्टोबरलाच निकाल लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या