बरं झालं आता फक्त एकच वर्ष काढायचं आहे, राहुल गांधींचा टोला

2277

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवली आहे.. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधत आता लोकसभा निवडणूकीच्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण करायला फक्त एकच वर्ष शिल्लक राहिल्याची आठवण करून दिली आहे. गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारला धारेवर धरले.

” चार वर्ष झाले अजून शेतकऱ्यांना योग्य हमीभावाचे आश्वासन दिले जातेय, चार वर्ष झाले आकर्षक योजना तयार करतात पण त्याला योग्य फंड देत नाहीत, चार वर्ष झाले अजुनही तरुणांसाठी नोकऱ्या नाहीत. बरं झालं आता फक्त एकच वर्ष काढायचा आहे.” असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देखील प्रसारमाध्यमाशी बोलताना राहुल गांधी यांनी अर्थसंकल्प आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात काहीही नाही. सरकारने त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच शस्त्र खाली ठेवली आहेत हा अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प आहे, अशी टीका त्यांनी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या