राहुल गांधींची ‘हात’सफाई, मुख्यमंत्र्यांना शेजारी बसवून ट्रॅक्टर सवारी

6

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. प्रचारादरम्यान राजकीय नेते कार, रेल्वे किंवा विमानाने प्रवास करताना आपण पाहिले आहे. परंतु काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पंजाबमध्ये वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. या ठिकाणी राहुल गांधी यांनी सफाईदारपणे ट्रॅक्टर चालवला. विशेष म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना शेजारी बसवून त्यांनी ट्रॅक्टर सवारीचा आनंद लुटला. याचा एक व्हिडीओ काँग्रेसने शेअर केला आहे.

राहुल गांधी आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या लुधियानामध्ये ट्रॅक्टर सवारी केली. व्हिडीओमध्ये राहुल गांधीच्या शेजारी कॅप्टन अमरिंदर सिंह दिसत असून अन्य काही नेतेही ट्रॅक्टर सवारीचा आनंद लुटत आहेत. यासोबत काही लोक ट्रॅक्टरसोबत चालतानाही दिसत आहेत. पंजाबमध्ये शेवटच्या टप्प्यात 13 जागांसाठी मतदान होणार आहे.