‘हा संपूर्ण देश माझं घर’; जूना बंगला परत मिळाल्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

rahul-gandhi

‘मोदींच्या आडनाव’ बदनामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांना संसद सदस्यत्व बहाल करण्यात आलं. मंगळवारी राहुल गांधी यांना दिल्लीतील सरकारी बंगलाही पुन्हा देण्यात आला आहे.

लोकसभा सभागृह समितीने राहुल गांधी यांना त्यांचा 12, तुघलक लेन येथीस जूना बंगला दिला आहे. यानंतर ‘संपूर्ण हिंदुस्थान माझे घर आहे’, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.

एप्रिलमध्ये, सुरत कोर्टानं मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर मार्चमध्ये खासदार म्हणून अपात्र ठरल्यानंतर, प्रोटोकॉलनुसार, राहुल गांधींनी मध्य दिल्लीतील त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले होते. अपात्र खासदाराला सरकारी निवासस्थान मिळू शकत नाही आणि त्याला अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मिळतो.

लोकसभेच्या गृहनिर्माण समितीनं त्यांना त्यांचा अधिकृत बंगला रिकामा करण्यास सांगितलं होतं. या ठिकाणी राहुल गांधी 2005 पासून राहत होते.