स्मृती इराणींचा ‘तो’ फोटो ट्वीट करून राहुल गांधी म्हणाले, ‘भाजपला माझाही पाठिंबा’

3448
rahul-gandhi

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभव स्वीकारावा लागताच गॅस सिलिंडरचे भाव वाढवण्यात आले. विना सबसिडीवाल्या गॅस सिलिंडरचे भाव वाढवल्याने काँग्रेसने भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा एक फोटो ट्वीट करून भाजपला आरसा दाखवला आहे.

राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांचा एक जुना फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये स्मती इराणी भाजप कार्यकर्त्यांसोबत गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याविरोधात जोरदार आंदोलन करताना दिसत आहे. केंद्रामध्ये युपीएचे सरकार असतानाचा हा फोटो आहे. युपीए सरकारने गॅस सिलिंडरचे भाव वाढवल्याने भाजपने आंदोलन केले होते. स्मृती इराणी भाजप कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरल्या होत्या

स्मृती इराणी यांचा या आंदोलनातील फोटो राहुल गांधी ट्वीट केला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरचे भाव 150 रुपयांनी वाढवल्याने सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना माझा पाठिंबा आहे, असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. तसेच भाववाढीचा हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.

जनता ‘गॅस’वर
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सामान्य नागरिकांनी झटका दिला. विना सबसिडीवाल्या गॅस सिलिंडरच्या किंमती 150 रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या. दिल्लीमध्ये 144.50, कोलकातामध्ये 149, मुंबईत 145 आणि चेन्नईमध्ये 147 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 12 फेब्रुवारीपासून नवे दर लागू झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या