राहुल गांधी ‘हरवले’, शोधून काढणाऱ्यास मिळणार ‘बक्षिस’

29

सामना ऑनलाईन । उत्तरप्रदेश

राहुल गांधींचा मतदार संघ असलेल्या अमेठीमध्ये राहुल गांधी हरवले असल्याची पोस्टर अनेक ठिकाणी लावण्यात आली आहेत. शोधून काढणाऱ्यास बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. काही पोस्टर अमेठीतील काँग्रेसच्या कार्यालयासमोरही लावण्यात आली आहेत.

अमेठी विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारासाठी राहुल गांधी येऊन गेले. नंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला पण राहुल गांधी मतदारसंघात आलेले नाहीत, अशी तक्रार अमेठीतील नागरिक करत आहेत. खासदारांमार्फत होणारी विकास कामं ठप्प झाली आहेत, अशीही नागरिकांची तक्रार आहे. पोस्टरमधून नागरिकांनी आपली व्यथा मांडली आहे.

‘माननीय खासदार श्री राहुल गांधी अमेठीतून बेपत्ता आहेत. त्यामुळे खासदारांमार्फत होणारी विकास कामं ठप्प आहेत. राहुल गांधींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षिस दिले जाईल.’ असे पोस्टरवर लिहिले आहे. पोस्टरच्या खाली हे अमेठी जनतेच्यावतीने प्रसिद्ध करत आहोत असेही लिहिले आहे.

पोस्टर प्रकरणी विचारले असता, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी पोस्टर लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. कामाच्या व्यापामुळे त्यांना सतत अमेठीत येणे शक्य नाही, असेही योगेंद्र मिश्रा म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या